7/12 Utara मध्ये झाले नवीन बदल

0
1744

7/12 Utara 7/12 उताऱ्यात झाले नवीन बदल

7/12 Utara सात बारा उतारा हा जमिनीचा महत्वाचा उतारा समजला जातो.

जमिनीची मालकी हंक्क दर्शविण्यासाठी सुध्दा त्याचा उपयोग होतो.

7/12 Utara हा गाव नमुना क्रमांक 7 आणि गाव नमुना क्रमांक 12 मिळुन बनलेला असतो,

यातील गाव नमुना क्रमांक 7 मंध्ये जमिनीचा मालकी हंक्क व इतर अधिकर दर्शविल्या जातात.

तसेच गाव नमुना क्रमांक 12 मंध्ये पिकाची नोंदणी केल्या जाते.

7/12 उताऱ्यामधील गाव नमुना क्रमांक 7 मंध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात येणार असुन त्याबाबत शासनाने परिपत्रक सुध्दा प्रकाशित केले आहे.

7/12 Utara

शासनाने प्रकाशित केलेल्या परिपत्रकाचा सारांश खालील प्रमाणे त्यात गाव नमुना क्रमांक 7 मंध्ये केलेल्या नविन बदलाबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे.

7/12 Utara
7/12 Utara

New 7/12 Utara (Format) Details

Document7/12 Utara (NEW Format)
StateMaharashtra
DepartmentRevenue Department
Official Websitehttps://rfd.maharashtra.gov.in/
Sat Bara Utara Details

महाराष्ट्र जमीन महसूल नियमपुस्तिका (खंड चार) मधील भाग (दोन) महाराष्ट्र राज्यातील ग्राम पातळीवरील महसुली लेखांकन पध्दती या विषयी आहे.

त्यानुसार ग्राम पातळीवरील महसुली लेखांकन करण्याकरीता, विविध नोंदवह्यांचा गाव नमुना व दुय्यम नोंदवह्या

यांचे नमुने विहीत करण्यात आलेले असुन त्याचा गोषवारा देखील देण्यात आलेला आहे.

राज्यातील ग्राम पातळीवरील महसुली लेखाकन पध्दती यामधील, गाव नमुना नंबर-७ हा अधिकार

अभिलेख या विषयी असून यामध्ये, संबंधीत जमिनीच्या भोगवटादार यांचे नाव,

शेतीचे स्थानिक नाव, भुमापन क्रमांक, भुधारणा पध्दती, धारण क्षेत्राचा तपशिल [लागवडी योग्य क्षेत्र, पोटखराब क्षेत्र (लागवडी योग्य नसलेले) एकूण क्षेत्र] आकारणी,

जुडी किंवा विशेष आकारणी, खाते क्रमांक, कुळाचे नांव, इतर अधिकार या ठळक बाबीचा तपशिल समाविष्ट आहे.

तर, गाव नमुना नंबर-१२ हा पिकांची नोंदवही या विषयी आहे.

या विभागाचा शासन निर्णय क्रमांक रा.भू.अ.२०१३/प्र.क्र.३२/ल-१, दिनांक २३ जानेवारी, २०१३ अन्वये

ई-फेरफार हा ऑनलाईन म्युटेशनचा कार्यक्रम सुरू करण्यास मान्यता दिली आहे.

त्यासाठी राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र, पुणे यांचे मार्फत ई-फेरफार ही आज्ञावली विकसित करण्यात आली आहे.

7/12 Utara झालेले बदत इतर माहिती

सदर आज्ञावलीव्दारे राज्यभरात ऑनलाईन फेरफार घेण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

त्यासाठी शासन परिपत्रक क्रमांक : सीएलआर-१००३/प्र.क्र.४७/ल-१ सेल, दि. ०३ डिसेंबर २००५ अन्वये या संगणकीकृत

अधिकार अभिलेखांना कायदेशीर वैधता देण्यात आली आहे.

राज्य शासनाने या विभागाच्या शासन परिपत्रक क्रमांक : रा.भू.अ.आ.का.२०१६/प्र.क्र.१८०/ल-१, दिनांक ११ जुलै, २०१७

अन्वये हस्तलिखित ७/१२ चे वितरण, दिनांक ३१ जुलै, २०१७ पासून पूर्णतः बंद करून ऑनलाईन फेरफार घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या विभागाच्या शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१५/प्र.क्र.२८४/ल-१, दिनांक ३ मार्च, २०२० अन्वये शासनाने

सातबारा उताऱ्यात झालेले बदल

गाव नमुना नं ७/१२८(अ) मध्ये वरच्या बाजूला मध्यभागी महाराष्ट्र शासनाचा लोगो व ई-महाभूमी प्रकल्पाच्या लोगोचा वाटरमार्क टाकण्यास मान्यता दिली आहे.

त्याप्रमाणे विहित गाव नमुना नं.७/१२ मध्ये यथोचित बदल करणेत आला आहे.

त्याचवेळी सध्याचा गाव नमुना नं.७/१२ मध्ये अधिका अधिक जमीन विषयक तपशिल खातेदारांना

उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कालानुरूप काही बदल करून, तो संबंधितांना समजण्यासाठी अधिकसोपा

होण्यासाठी संगणकीकृत गाव नमुना नं.७ मध्ये सुधारणा करुन ई-फेरफार प्रणालीत ठेवणे व वितरण करणे यास देखील शासनाची मान्यता आवश्यक आहे.

या बाबी विचारात घेवून, “गाव नमुना नं.७ अधिकार अभिलेख पत्रक” चा सुधारित नमूना नव्याने लागू

करण्याबाबत आणि अधिकार अभिलेख पत्रक सुधारित नमून्यात ठेवणे व वितरीत करण्याबाबत क्षेत्रिय

महसूली अधिकारी व प्राधिकारी यांना दिशानिर्देश देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

Sat Bara Utara
Sat Bara Utara

7/12 Utara बाबत शासन निर्णय

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील तरतूदीनुसार क्षेत्रीय महसूली यंत्रणा व प्राधिकारी

यांना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत की, महाराष्ट्र राज्यातील ग्राम पातळीवरील महसुली

लेखांकन पध्दती मधील गाव नमुना नं.७ अधिकार अभिलेख पत्रक यामध्ये खालील तपशिल

उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सोबत जोडलेल्या परिशिष्ट-“अ” मध्ये विहित केलेल्या नमुन्यात अधिकार

अभिलेख पत्रक ठेवण्यास आणि वितरीत करण्यास याव्दारे शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

सुधारीत “गाव नमुना नं.७ अधिकार अभिलेख पत्रक” मधील तपशिलाच्या बाबी :

A. गाव नमुना नं. ७ मध्ये गावाच्या नावासोबत LGD (Local Government Directory) कोड दर्शविण्यात यावा.

B. गाव नमुना नं.७ मध्ये (अ) लागवडीयोग्य क्षेत्र व (ब) पोट खराब क्षेत्र या सोबत एकूण क्षेत्र (अ+ब) दर्शविण्यात यावे.

C. गाव नमुना नं.७ मधील क्षेत्राचे एकक नमुद करुन, यात शेती क्षेत्रासाठी हे.आर.चौ.मी. आणि बिनशेती

  • क्षेत्रासाठी आर.चौ.मी. हे एकक वापरावे. गाव नमुना नं.७ मध्ये खाते क्रमांक हा पूर्वी इतरहक्क रकान्यासोबत
  • नमूद केला जात असे, यापुढे खाते क्रमांक खातेदार / खातेदारांच्या नावासोबतच नमूद केला जावा.
  • गाव नमुना नं.७ मधील मयत खातेदार अथवा संपूर्ण क्षेत्र विक्री केलेले खातेदार व इतर हक्कातील कमी
  • केलेले कर्ज बोजे अथवा ई-कराराच्या नोंदी कंस करून दर्शविल्याजात होत्या,
  • आत्ता ती कमी केलेली नावे व नोंदी कंस करून त्यावर एक आडवी रेषा मारून खोडून (strike through) दर्शविण्यात यावा.
  • कोणत्याही गाव नमुना नं.७ वर नोंदवलेले परंतु निर्गत न झालेले फेरफार (प्रलंबित असे पर्यंत) प्रलंबित

इतर माहिती

फेरफार म्हणून इतर हक्क रकान्याच्याखाली स्वतंत्र रकान्यात दर्शविण्यात यावेत.

तसेच संबंधित भूमापन क्रमांक व उपविभाग क्रमांकावर एक ही फेरफार प्रलंबित नसल्यास प्रलंबित फेरफार नाही असे दर्शविण्यात यावे.

कोणत्याही गाव नमुना नं.७ वर नोंदविण्यात आलेला शेवटचा फेरफार क्रमांक व त्याचा दिनांक इतर हक्क

रकान्याच्या खाली शेवटचा फेरफार क्रमांक व दिनांक हा नवीन रकाना समाविष्ट करुन दर्शविण्यात यावा.

फेरफार घेण्याची प्रक्रिया ई-फेरफार प्रणालीद्वारे ऑनलाईन सुरु झाल्यापासून

7/12 Utara मधे हे सुध्दा बदल

एखद्या स.नं. /गट नं. वर एकही फेरफार नोंदविला नसल्यास, शेवटचा फेरफार क्रमांक व दिनांक या रकान्यात काहीही दर्शविले जाणार नाही.

या गाव नमुना नं.७ वरील सर्व जुने फेरफार क्रमांक गाव नमुना नं.७ वर सर्वात शेवटी जुने फेरफार क्रमांक या नवीन रकान्यात एकत्रीतरित्या दर्शविण्यात यावेत.

गाव नमुना नं.७ मधील कोणत्याही दोन खात्यातील नावांचे मध्ये डॉटेड लाईन छापण्यात यावा.

त्यामुळे खातेदारांचे नावामध्ये अधिक स्पष्टता येईल. शेती क्षेत्रासाठी व बिनशेती क्षेत्रासाठी स्वतंत्र गाव नमुने थोडासा बदल करून दर्शविण्यात यावेत.

तसेच बिनशेतीच्या गा.न.नं.७ मध्ये पोट खराब क्षेत्र, जुडी व विशेष आकारणी, तसेच इतर हक्कात कुळ व खंड हे रकाने वगळण्यात यावेत.

बिनशेती क्षेत्राचे गाव नमुना नं.७/१२ साठी एकत्रितपणे गा.न.नं.१२ छापून त्याखाली सदरचे क्षेत्र

अकृषक क्षेत्रामध्ये रुपांतरीत झाले असल्याने या क्षेत्रासाठी गाव नमुना न.१२ मधील माहिती भरण्याची आवश्यकता नाही.

Adv