जमिनिंच्या मालकीहंक्काच्या कागदपत्रात सातबारा उतारा खुप महत्त्वाचा असतो, तसेच शेतीआधारीत योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी असल्याला पुरावा म्हणुन सुध्दा सातबारा उतारा महत्त्वाचा आहे, नमुना क्रमांक 7 आणि नमुना क्रमांक 12 दोन्ही मिळुन 7/12 उतारा बनतो, आता याच 7/12 उताऱ्यामंध्ये 11 मोठे बदल करण्यात आले आहे, संध्याचा प्रचलित 7/12 उताऱ्याचा नमुना हा फार पुर्विपासुन चालत आलेला आहे त्यात जास्त मोठे बदल अजुन पर्यंन्त करण्यात आलेले नव्हते.
जुन्या नमुन्यात संध्या अस्तित्वात असलेला 7/12 उतारा नवीन व्यक्तिस समजण्यास थोडा किचकट व गुंतागुंतीचा होता, आता राज्य सरकारच्या निर्देशानुसार तुम्हाला नवीन 7/12 उतारा सुटसुटीत तसेच समजण्यास सोप्या नमुन्यामंध्ये बघायला मिळणार आहे. राज्यसरकारणे मागील काहि काळापासुन प्रचलित हस्त लिखीत 7/12 उतारा संगणकीकृत डिजीटल स्वाक्षरीसह देण्यास सुरूवात केली, तसेच बदलत्या काळानुसार प्रचलीत 7/12 उताऱ्याच्या नमुन्यात बदल करणे गरजेचे होते त्यामुळे आता काळाची गरज ओळखता 7/12 उताऱ्यामंध्ये आता नवीन 11 बदल करण्यात येणार आहे.
नवीण सुधारीत संगणकीकृत डीजीटल स्वाक्षरीसह मिळणाऱ्या गाव नमुना 7/12 उताऱ्यात खालील बदल करण्यात येणार आहे
1) गावाच्या नावासोबत आता गाव नमुना नंबर 7 मंध्ये LGD म्हणजेच Local Government Directory हा कोड असणार आहे.
2) लागवडीयोग्य क्षेत्र व पोट खराब क्षेत्र गाव नमुना नंबर 7 मंध्ये दर्शविण्यात येईल त्याचबरोबर सोबतच लागवडीयोग्य क्षेत्र व पोट खराब क्षेत्र दोन्ही मिळुन एकुण क्षेत्र दर्शविण्यात येईल.
3) नमुना नंबर 7 मंध्ये उल्लेखीत क्षेत्राचे एकक समजण्यासाठी एकक हा स्वतंत्र रकाना असणार असुन त्यात शेती क्षेत्रासाठी हेक्टर, आर, चौरस मीटर, आणि बिगर शेती क्षेत्रासाठी आर, चौरस मीटर हे एकक वापरले जाणार आहे.
4) नमुना नंबर 7 मंध्ये खाते क्रमांकाचा उल्लेख असतो, आधीच्या नमुन्यात इतरहक्क रकान्यासोबत खाते क्रमांक नमुद केला जात होता आता खातेदारांच्या नावासोबतच खाते क्रमांक नमुद केल्या जाईल.
5) पुर्वीच्या नमुना नंबर 7 मंध्ये मयत झालेल्या खातेदाराचे नाव अथवा संपूर्ण क्षेत्र विक्री केलेल्या खातेदाराचे व इतर हक्कातील कमी केलेल्या कर्ज बोज्यांचे अथवा ई-कराराच्या नोदी कंस करून त्यात दर्शविल्या जात होत्या आता मात्र कमी केलेली नावे व नोंदी कंस करून त्यावर एक आडवी रेघ मारून म्हणजेच खोडून दर्शविण्यात येतील.
6) नमुना नंबर 7 मंध्ये नोंदवलेले व निर्गत न झालेले फेरफार प्रलंबित असे पर्यंन्त, प्रलंबित फेरफार म्हणुन इतर हक्क रकान्याच्याखाली स्वतंत्र रकान्यात नवीन नमुन्यानुसार दर्शविण्यात येतील, तसेच संबंधित भुमापन क्रमांक व उपविभाग क्रमांकावर एकही फेरफार प्रलंबीत नसल्यास प्रलंबीत फेरफार नाही असे दर्शविण्यात येईल.
7) नमुना नंबर 7 वर नोंद करण्यात आलेला शेवटच्या फेरफार क्रमांक व त्याचा दिनांक इतर हक्क या रकान्याच्या खाली शेवटचा फेरफार क्रमांक व दिनांक हा नवीन रकाना तयार करून त्यात दर्शविण्यात येईल, फेरफार घेण्याची प्रक्रिया ई-फेरफार प्रणालीव्दारे ऑनलाईन सुरू झाल्यापासुन एखाद्या गट नंबरवर एकही फेरफार नोंदविला नसल्यास शेवटचा फेरफार क्रमांक व दिनांक या रकान्यात काहीही दर्शविल्या जाणार नाही.
8) नमुना नंबर 7 वरील सर्व जुने फेरफार क्रमांक नमुना नंबर 7 वर सर्वात शेवटी जुने फेरफार क्रमांक या नवीन रकान्यात एकत्रीतरीत्या दर्शविण्यात येतील.
9) बिगर शेती क्षेत्रासाठी तसेच शेती क्षेत्रासाठी स्वतंत्र गाव नमुना काही बदल करून दर्शविण्यात येणार आहे, बिगर शेतीसाठीच्या नमुना नंबर 7 आणि 12 मंध्ये पोट खराब क्षेत्र, जुडी, तसेच विशेष आकारणी व इतर हक्कात कुळ व खंड हे रकाने वगळण्यात येतील.
10) नमुना नंबर 7 मधील कोणत्याही दोन खात्यातील नावांच्या मंध्ये टिंब असलेली ओळ छापण्यात येईल त्यामुळे खातेदारांच्या नावामंध्ये अधिक स्पष्टता येईल.
11) बिगरशेती क्षेत्राच्या नमुना नंबर 7 साठी नमुना नंबर 12 ठेवणे आवश्यक नसल्याने बिनशेती क्षेत्रासाठी नमुना नंबर 12 छापला जाणार नाहि, तसेच त्यावर सदरचे क्षेत्र अकृषक क्षेत्रामंध्ये रूपांतरीत झालेले असल्याकारणाने या क्षेत्रासाठी गाव नमुना नंबर 12 ची आवश्यक नाहि अशी सुचना छापण्यात येईल.