खताचे दर प्रचंण्ड वाढले, जाणुन घ्या नविन व जुने दर

0
566

खताच्या किंमती मंध्ये प्रचंण्ड दरवाढ करण्यात आलेली असून याचा परिणाम निश्चितच शेतकऱ्यांवरती मोठ्या प्रमाणात होणार आहे, इफको कंपनीचे विपणन डायरेक्टर योगेद्र कुमार यानी दिनांक 07 एप्रिल 2021 रोजी नविन खताच्या किंमती संदर्भात पत्रक जाहिर केले या पत्राप्रमाणे खालील खताच्या प्रकारात दरवाढ झालेली दिसून येत.

खाली खताचा प्रकार तसेच नविन व जुनी किंमत दर्शवीलेली आहे.

अ.क्र.खताचा प्रकार      जुनी किंमतनविन किंमत प्रती बॅग (50 कि.ग्रॅ.)
1.डि.ए.पी.1200 /- रू.1900 /- रू.
2.एन.पी.के 10.26.261175 /- रू.1775 /- रू.
3.एन.पी.के 12.32.161185 /- रू.1800 /- रू.
4.एन.पी.के 20.20.0.13925 /- रू.1350 /- रू.
5.एन.पी.के 15.15.15 – 1500 /- रू.

इफको कंपनीचे विपणन डायरेक्टर यांनी दिनांक 07 एप्रिल रोजी काढलेले खताच्या नविन किंमती संदर्भातील पत्रक

IFFCO Fertilizer Price List

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकाचे मोठे नुकसान झालेले होते त्यानंतर कोरोनाचा शिरकाव झाला व कोरोना काळात लागलेल्या लॉकडाऊन मुळे शेती मालाच्या घसरलेल्या भावामुळे शेतकरी आधीच मेटाकुटीला आलेला असतांना आता खताच्या या वाढलेल्या किंमती मुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन नक्कीच कोलमडणार आहे, आधीच शेतीमालाला नसलेला भाव आणि आता शेतीसाठी आवश्यक खताच्या भावात वाढ यामुळे शेती आता शेतकऱ्यांसाठी तोट्याची ठरणार आहे.

रासायनिक खताच्या दरवाढीमुळे शेतकरी शेद्रिय शेतीकडे जरी वळणार असला तरी रासायनिक खताच्या तुलनेत शेद्रिय शेती अद्याप शेतकऱ्यांना परवडणारी नाहि त्यामुळे बहुतांश शेतकरी आधीच कर्जबाजारी असून आता भविष्यात आणखी शेतकऱ्यांचा त्यात भर पडणार आहे, खता सारख्या आवश्यक घटकाकडे सरकारणे लक्ष देणे आवश्यक असून खताचे दर नियंत्रणात ठेवणे गरजेचे बनले आहे. खताची किंमत वाढल्यामुळे खताचा उपयोग सुध्दा कमी होणार असून परिणामी शेती उत्पादनात सुध्दा भविष्यात घट दिसून येवु शकते.

शेतकरी वर्गाकडून खत दरवाढीचा मोठा विरोध होतांना दिसत असून, दरवाढीच्या संदर्भात शेतकरी वर्गात नाराजी पसरलेली आहे, कोरोना मुळे सततच्या लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांची स्थिती आधिच बिकट बनलेली असून खताची दरवाढ शेतकऱ्यांच्या जखमेवर सरकाकडुन मिठ चोळण्यासारखा प्रकार आहे. खताची किंमत कमी करून शेतकऱ्यांना सरकारतर्फे मदत करावी अशी मांगणी आता शेतकरी वर्गाकडून होत आहे.

Adv