खरीप Pik Vima 2021-22 महत्पपूर्ण माहिती
कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या द्वारा दिनांक : 30 जुन, 2021. रोजी Pik Vima 2021-22 संदर्भात प्रसिध्दी पत्रक प्रसिध्द करण्यात आले.
pik vima 2021-22 खरीप हंगाम 2021-2022 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात बीड सोबतच इतर जिल्हयातील
शेतकरी नोंदणीसाठी राष्ट्रीय विमा संकेतस्थळ कार्यान्वित करण्यासंदर्भात शासनाने निर्देश दिले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.
Pik Vima अर्ज भरण्याची अंतिम तारीख :
योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत खरीप हंगाम 2021 करिता दिनांक 15 जुलै, 2021 हि आहे.
पिकपेरा स्वयंघोषणापत्र PDF डाऊनलोड ऑनलाइन 2021-22
पीक विमा भरण्यासाठीची वेबसाईट :
Pik Vima 2021-22 भरण्यासाठीचे कागदपत्रे :
- 7/12 उतारा
- 8 अ उतरा
- पीक पेरा घोषनापत्र
- आधार कार्ड
- बॅक पासबुक झेरॉक्स
- पीक विमा माहिती अर्ज
- पीक विमा प्रिमीयम शुल्क
- चालु स्थितीतला मोबाईल क्रमांक
Pik Vima 2021-22 Details
Scheme | Pik Vima 2021-22 Registration |
State | Maharashtra |
Year | 2021-2022 |
Official Website | https://pmfby.gov.in/ |
Pik Vima 2021-22 योजनेठी खालील ठिकाणा वरून अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे :
- विभागीय कृषि सह संचालक
- जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
- उपविभागीय कृषि अधिकारी
- तालुका कृषि अधिकारी
- नजिकच्या बँक
- आपले सरकार सेवा केंद्र (CSC)
जिल्हा निहाय नियुक्त कंपण्या व त्यांचा टोल फ्री क्रमांक Pik Vima 2021-22 :
प्रिमियम चार्ट Pik Vima 2021-22:
योजने अंतर्गत खलील जोखिम बाबींचा खरीप हंगाम Pik Vima 2021-22 करीता समावेश करण्यात आला आहे.
1.हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान (Prevented Sowing / Planting / Germination) :
खरीप हंगामातील अपूरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे केवळ
अधिसुचित मुख्य पिकांची अधिसुचित क्षेत्रात सर्वसाधारण क्षेत्राच्या 75 टक्के पेक्षा
जास्त क्षेत्रावर पेरणी/ लावणी न झाल्यास विमा संरक्षण देय राहील.
2.पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान (Mid season adversity) :
सर्वसाधारण काढणीच्या 15 दिवस आधीपर्यंत पूर, पावसातील खंड, दुष्काळ इ. बाबींमुळे
शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये सरासरी उत्पादनाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर अधिसुचित क्षेत्रस्तरावर विमा संरक्षण देय राहील.
3.पिक पेरणीपासून काढणी पर्यन्तच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट (Standing Crops):
टाळता न येणाऱ्या जोखमींमुळे पिकांच्या उत्पन्नात येणा-या घटीपासून व्यापक विमा संरक्षण दिले जाते.
अधिसुचित विमा क्षेत्र घटकातील पिक कापणी प्रयोगावरुन उपलब्ध झालेल्या सरासरी उत्पन्नाची
तुलना उंबरठा उत्पन्नाशी करुन नुकसान भरपाई निश्चित केली जाते.
जर सरासरी उत्पन्न हे उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी आले तर नुकसान भरपाई देय होईल.
4.स्थानिक नैसर्गिक आपत्ती: (Localized Calamities) :
या बाबी अंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफूटी, विज कोसळल्यामुळे
लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसुचित पिकाचे
ठरावीक क्षेत्रातील नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येते.
5.काढणी पश्चात नुकसान: (Post Harvest Losses) :
ज्या पिकांची काढणीनंतर शेतात पसरवून अथवा पेंढ्या बांधुन सुकवणी करणे आवश्यक असते
अशा कापणी/काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसुचित पिकाचे काढणीनंतर दोन
आठवड्यांच्या आत (14 दिवस) गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगरमोसमी
पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निकषांचे अधिन राहून नुकसान भरपाई निश्चित केली जाईल.
काढणीपश्चात नुकसान व स्थानिक आपत्ती या जोखिमे अंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्वे नंबर नुसार
बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत क्रॉप इंश्युरन्स ॲप (Crop Insurance App) / संबंधित
विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक / बँक / कृषि व महसूल विभाग यांना कळविण्यात यावे.
नुकसान कळवताना सर्व्हे नंबर वनुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळविणे बंधनकारक असेल.
राज्यात खरीप हंगाम 2021 मध्ये योजना खाली नमूद केलेल्या विमा कंपनीकडून संबंधित जिल्हा समुहामध्ये राबविण्यात येईल.
- Kharip Pik Vima 2024 खरीप पीक विमा Online अर्ज कागदपत्रे
- Pocra 2.0 पोकरा दुसरा टंप्पा सुरू – असा करा अर्ज
- Dushkal Anudan Yadi 2024 दुष्काळ अनुदान यादी 2024 डाऊनलोड
- Kunbi Nondi Download कुणबी नोंदी गावनिहाय
- Pradhan Mantri Suryodaya Yojana Online Registration
- अवेळी पाऊस, गारपीट मदत यादी 2023 Avkali Pauss Madat Yadi
बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा संरक्षण मिळणेस्तव विहित मुदतीपुर्वी
नजीकचे बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्त्यासह तसेच आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा.
कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्याचा / न होण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
शेतकरी योजनेत सहभाग नोंदविण्यास इच्छुक नसेल तर तसे घोषणापत्र योजनेतील सहभागी होण्याच्या
अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदरपर्यंत देणे आवश्यक आहे.
जे शेतकरी योजनेत सहभागी न होणे बाबत घोषणापत्र देणार नाहीत त्या सर्व शेतकऱ्यांचा विमा हप्ता
कपात करुन योजनेत सहभागी करुन घेणेबाबत बँकेमार्फत कार्यवाही केली जाईल.
योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार विमा कंपनी शेतकरी विमा हप्ता आणि केंद्र व राज्य शासनाकडून
विमा अनुदानाचा पहिला हप्ता प्राप्त झाल्यानंतर पिक पेरणी/ लावणीपुर्व नुकसान भरपाई / हंगामामध्ये प्रतिकुल
पिक विमा 2021-22 इतर माहिती
परिस्थितीमुळे झालेले नुकसान /स्थानिक आपत्ती या जोखिमींच्या बाबींकरीता नुकसान भरपाईची पुर्तता करतील.
त्याचप्रमाणे उत्पन्नाच्या आकडेवारीवर आधारित व काढणी पश्चात नुकसान भरपाई या
जोखिमीच्या बाबींकरीता नुकसान भरपाईची पुर्तता केंद्र व राज्य शासनाकडून विमा अनुदान अंतिम हप्ता प्राप्त झाल्यानंतर करतील.
विमा योजनेतंर्गत विविध जोखिमीतंर्गत निश्चित होणारे नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या
मार्गदर्शक सुचनेच्या अटी व शर्तीच्या आधिन राहून निश्चित केले जाते.
हंगामात घेण्यात आलेल्या पिक कापणी प्रयोगातून प्राप्त होणाऱ्या सरासरी उत्पन्नाची
तुलना ही उंबरठा उत्पन्नाशी करुन हंगामाच्या शेवटी नुकसान भरपाई निश्चित करण्यात येते.
या योजनेअंतर्गत नुकसान भरपाई निश्चित करतांना पैसेवारी, दुष्काळ, टंचाई परिस्थिती आणि पुरामुळे
झालेल्या नुकसानी संदर्भात कोणत्याही शासकीय विभाग/संस्थेमार्फत घोषित करण्यात आलेली आकडेवारी ग्राह्य धरता येत नाही.
योजनेतील सहभागासाठी तात्काळ नजीकच्या विभागीय कृषि सह संचालक,
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच नजिकच्या बँक,
आपले सरकार सेवा केंद्र (CSC) यांचेशी संपर्क साधावा.