जमिन मोजणीचे प्रकार व Jamin Mojani Mahiti
जमिनीची मोजणी ही कायम शेतकऱ्यांसाठी समस्या म्हणुन उभी राहिलेली आहे, बऱ्याचदा कुटुंब विभक्त झाल्यानंतर जमिनीची वाटणी केली जाते, मात्र वाटणी करतांना शेतमोजणी वरून वादविवाद होतात, जमिन मोजतांना गडबड झाल्याचे कारण पुढे केले जाते, प्रसंगी वाद विकोपाला जाऊन प्रकरण हाणामारी अथवा न्यायालयीन होऊन बसते, आज आपण या ठिकाणी Jamin Mojani Mahiti व जमिन मोजण्याच्या विविध प्रकारांबाबत माहिती पाहुयात.
साधी जमिन मोजणी
साधी जमिन मोजणी हि पारपारीक पध्दतीने केल्या जात असून, साध्या मोजणीचा उपयोग हा आपल्याला फार मोठ्या प्रमाणात होतांना दिसून येतो. हि मोजणी गावातीलच ज्या व्यक्तिला जमिन मोजण्याचे ज्ञान आहे त्याच्याकडुन करून घेतल्या जाते. मात्र या मोजणी प्रक्रियेत बऱ्याचदा व्यक्तिनिष्ठपणा झाल्याचे आपल्याला दिसुन येते. तसेच जमिन मोजणाऱ्या व्यक्तिचे ज्ञान अपुरे असेल तर त्याचा सुद्धा मोजणी प्रक्रियेवर परिणाम होऊन अचुक मोजणी होऊ शकत नाही. न्यायालयीत प्रकरणात साध्या पद्धतीने केलेल्या मोजनीला कोणताही आधार नाही.
व्यावसाईक जमिन मोजणी
आज अनेक जमिन मोजुन देणाऱ्या खाजगी कंपण्या अस्तित्वात आलेल्या आहेत. काही निश्चित शुल्क आकारून प्रशिक्षीत कर्मचारी अचुक मोजणी करून देतात. आधुनिक यंत्र सामुग्रीचा जमिन मोजणीसाठी खाजगी कंपन्याव्दारे मोठ्या प्रमाणावर वापर करतात. यामुळे जामिन मोजणी कमी वेळात होते तसेच मोजणीत अचुकता सुद्धा असते. साधारण खाजगी जमिन विकासक तथा रस्त्यांची अथवा इतर सरकारी कंत्राट घेणारे खाजगी व्यावसाईक हे या खाजगी मोजणी करणाऱ्या कंपन्यांची मदत घेतात, न्यायालयीन प्रकरणात मात्र या खाजगी कंपण्याव्दारे केलेल्या मोजणीला ग्राह्य धरण्यात येत नाही.
सरकारी जमिन मोजणी
भुमि अभिलेख कार्यालयाकडुन केल्या जाणाऱ्या मोजणीला सरकारी मोजणी असे सुद्धा साधारणतः म्हणतात. भुमि अभिलेख कार्यालयाकडुन कोणत्याही जमिन मालकाला जमिन मोजणी साठी शासकिय फि भरून मोजणी करून घेता येते. भुमि अभिलेख कार्यालयाकडुन केल्या जाणारी जमीन मोजणीत साधी मोजणी व तातडीची मोजणी असे दोन प्रकार आहे. साध्या प्रकारच्या मोजणीला थोडा जास्त कालावधी लागतो तथा मोजणी फी सुद्धा कमी असते तसेच तातडीची मोजणी हि अर्ज केल्यानंतर कमी कालावधीत केली जाते मात्र तातडीच्या मोजणीसाठी शुल्क अधीक आकारल्या जाते. न्यायालयीन प्रकरणात भुमि अभिलेख कार्यालयाकडून केलेल्या साहमा तसेच तातडीच्या दोन्ही मोजणीला ग्राह्य धरण्यात येते.
उपग्रहाच्या सहाय्याने केली जाणारी जमिन मोजणी
आज दिवसेंदिवस तंत्रज्ञानात प्रचंड मोठ बदल होत चाललेला असून तंत्रज्ञानाच्या मदतीने घरात बसून जमिनीची मोजणी करता येणे शक्य झालेले आहे, आज गुगल कंपणीसारख्या नावाजलेल्या कंपणीच्या “गुगल अर्थ” या मोबाईल ॲपच्या मदतीने मोबाईलवर काही मिनीटात जमिनीची मोजणी करता येत आहे, शिवाय मोजणी करण्यासाठी कोणतेही शुल्क लागत नसून फक्त स्मार्टफोन आणि इंटरनेटची आवश्यकता मात्र असते. शासकिय जमिन मोजणी करण्याआधी आपली जमिन किती आहे हे पाहण्यासाठी अत्यंत सोपा पर्याय म्हणजे या प्रकारची मोजणी होय. न्यायालयीन प्रकरणात मात्र हि मोजणी ग्राह्य धरण्यात येत नाही.