महाराष्ट्र राज्यामचील उर्जा विभागा मार्फत विलासराव देशमुख अभय योजना ( Vilasrao Deshmukh Abhay Yojana ) राबविली जात आहे.
राज्यातील काही वीज ग्राहकांचे वीज बिले हि थकलेली आहेत अश्या विज ग्राहकांना या योजनेचा लाभ हा घेता येणार आहे.
सतत वीज बिल थकल्यामुळे राज्यात बऱ्याच वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन हे खंडीत करण्यात आलेले आहे.
राज्यात आता राबविण्यात येत असलेल्या Vilasrao Deshmukh Abhay Yojana मुळे आता ज्या ग्राहकांची वीज खंडीत करण्यात आलेली आहे
अश्या ग्राहकांना आता नव्याने वीज जोडणी मिळू शकणार आहे.
महावितरण व्दारे थकित वीज बिल असलेल्या ग्राहकांना वीज बिल भरण्या बाबत वारंवार आवाहन करावे लागते, तरी सुध्दा जे ग्राहक वीज बिल भरत नाही
अश्या ग्राहकांचे वीज कनेक्शन महाविरण तर्फे कायमस्वरूपी बंद केल्या जाते.
आता अश्या कायमस्वरूपी वीज खंडित केलेल्या ग्राहकांकरीता माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नावाने
“विलासनाव देशमुख अभय योजना” हि राबविण्यात येत आहे.
या योजनेच्या माध्यमातून महावितरण च्या आर्थिक परिस्थिती मधे सुधारणा होऊ शकते तसेच खंडीत वीज पुरवठा केलेल्या
ग्राहकांना नव्याने परत वीज कनेक्शन मिळू शकणार आहे.
महावितरण तर्फे थकबाकीत वीज बिलात काहि सवलत देऊन घरगुती वीज कनेक्शन, व्यावसाईक वीज कनेक्शन तसेच औद्यागिक वीज कनेक्शन
ग्राहकांना आपला वीज पुरवठा पुर्ववत सुरू करता येईल.
विलासराव देशमुख अभय योजना माहिती
योजनेचे नाव | विलासराव देशमुख अभय योजना |
योजनेचे वर्ष | 2021-2022 |
विभाग | ऊर्जा विभाग, महाराष्ट्र शासन |
अधिकृत संकेतस्थळ | https://industry.maharashtra.gov.in/ |
शासन | महाराष्ट्र शासन |
योजनेची अंतिम तारीख | 31 ऑगस्ट 2022 |
- या योजनेव्दारे कायमस्वरूपी वीज पुरवठा बंद झालेल्या ग्राहकांना थकित वीज बिलात सवलत देण्यात येणार आहे.
- थकित वीज बिलामुळे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडीत केलेल्या ग्राहकांची एकुण महाराष्ट्रातील संख्या 32,16,500 इतकी आहे.
- राज्यात एकूण दंडासहीत वीज बिल थकित रक्कम हि 9,354 कोटी इतकी आहे.
- वीज बिलाची थकबाकीची मूळ रक्कम हि 6,261 कोटी इतकी आहे.
Vilasrao Deshmukh Abhay Yojana ठळक वैशिष्ट्ये
- ज्या वीज ग्राहकांचे वीज बिल थकलेले आहेत अश्या वीज ग्राहकांच्या वीज बिलातील थकित मुद्दल एकरकमी भरणाऱ्यांना अधिकची सवलत देण्यात येणार आहे.
- वीज बिल भरण्या करीता सुलभ हप्त्यात वीज बिज थकबाकी भरण्याची सोय सुध्दा या योजने मार्फत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
- ज्या वीज ग्राहकांचे वीज जोडणी खंडीत करण्यात आलेले आहे त्यांना योजने मधून वीज फेरजोडणीचा लाभ घेता येणार आहे.
विलासराव देशमुख अभय योजना चे फायदे
- राज्यातील जवळपास 32 लाख वीज पुरवठा खंडीत केलेल्या ग्राहकांना पुन्हा वीज जोडणी मिळणार आहे.
- यामुळे राज्यातील मोठ्या प्रमाणात व्यावसाईक व औद्योगिक आस्थापना पुन्हा सुरू होणार आहे.
- या योजनेच्या माध्यमातून लाभ घेवून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बंद झालेले उद्योग परत नव्याने सुरू होऊन रोजगार निर्मिती सुध्दा होऊ शकणार आहे.
- थकबाकीत वीज बिलाची मोठ्या प्रमाणात वसूली होऊन महाविरणची राज्यात डबघाईला आलेल्या आर्थिक परिस्थितीमधे सुध्दा मोठ्या प्रमाणात सुधारणा होऊ शकते.
विलासराव देशमुख अभय योजनेचा लाभ कोण घेऊ शकणार आहे ?
- घरगुती, व्यावसाईक व औद्योगिक वीज जोडणी असलेल्या व वीज बिल थकित झालेले ग्राहक या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे.
- या योजनेमधून मात्र कृषी ग्राहकांना वगळण्यात आलेले आहे, कृषी ग्राहक म्हणजेच शेती करीता वीज जोडणी घेतलेल्या ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- सर्व कृषी ग्राहकांना वगळून इतर सर्व वर्गवारीतील ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
योजनेचा कालावधी
Vilasrao Deshmukh Abhay Yojana राज्यात दिनांक 1 मार्च 2022 पासून राबविण्यात येत असून दिनांक 31 ऑगस्ट 2022 पर्यंन्त या योजनेचा लाभ वीज ग्राहकांना घेता येणार आहे.
विविध सरकारी योजनांचे वेळीच अपडेट मिळवीण्या करीता खालील टेलिग्राम चॅनला ज्वाईन करा
https://t.me/officialtechwithrahul
अधीक माहिती करीता खालील व्हिडीओ पहा
- Kharip Pik Vima 2024 खरीप पीक विमा Online अर्ज कागदपत्रे
- Pocra 2.0 पोकरा दुसरा टंप्पा सुरू – असा करा अर्ज
- Dushkal Anudan Yadi 2024 दुष्काळ अनुदान यादी 2024 डाऊनलोड
- Kunbi Nondi Download कुणबी नोंदी गावनिहाय
- Pradhan Mantri Suryodaya Yojana Online Registration
- अवेळी पाऊस, गारपीट मदत यादी 2023 Avkali Pauss Madat Yadi